वप्न मजला आवडते

बागेतील तारका

 स्वप्न मजला आवडते

ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या,

स्वप्न मजला आवडते भावते

कल्पनेचे राज्य जरी,

आनंददायी वाटते….II धृ II

तव प्रतिमा मनी बसवली,

आठवण सदैव येवू लागली  ।

जागेपणी मिळे न मजला,

स्वप्नी सारे तेच अनुभवते…….१

स्वप्न मजला आवडते ,

पूर्णत्वाचे सुख आगळे,

जीवन प्रवाही येती अडथळे  ।

हवे हवेसे मनी ठरवी ते,

केवळ स्वप्नची मिळवूनी देते….२

स्वप्न मजला आवडते ,

कल्पना भाव तरंगे उठूनी,

रात्री गेल्या कित्येक रंगूनी  ।

क्षणीक असूनी भ्रामक जरी,

स्वप्न दिलासी देवून जाते….३

स्वप्न मजला आवडते,

विश्वपसारा मायेचा हा,

जीवन गुंता दिसतो पहा  ।

किरण आशेचे त्यात चमकूनी,

स्वप्न हे वरदान ठरते….४

स्वप्न मजला आवडते

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 शक्य आहे का ते ?

बागेतील तारका

 शक्य आहे का ते ?

आज हे आकाश मजला,  थोटके का भासते  ।

झेप घेण्या पंख फूटतां,  हाती येईल काय ते ?  १

उंच हा गिरीराज देखूनी,  शिखर चढावे वाटते  ।

चार पावले टाकतां क्षणी,  चढणे सोपे काय ते ?  २

अथांग सागर खोल जरी ,  डूबकी घ्यावी वाटते  ।

जलतरण कला अवगत होता,  सूर मारणें जमेल कां ते? ३

काव्य सरिता वाहात आहे,  ज्ञान गंगोत्री भासते  ।

केवळ कविता चार रचूनी,  त्यात डूबनें शक्य कां ते? ४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

बागेतील तारका

 काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे  । 

कष्ट सोसले शरिर मनानें,  चिज तयाचे झाले दिसे…..१

बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने  ।

यश ना पडले पदरी.  केव्हा मान फिरविता नशीबाने….२

निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती  ।

शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती….३

लिहीता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता  ।

छंद लागूनी नशाच चढली,  जीवनामधील रंग बघता…४

त्या रंगाच्या छटा उमटल्या,  फुला फुलातूनी दिसूनी येती  ।

सप्त रंगाचे मिलन दिसले,  आकाशाच्या क्षीतीजावरती….५

काव्यावरती जगेल कोण,  हवी भाकरी जगण्यासाठी  ।

मानहानी ती सदैव होई,  केवळ अल्पशा पैशापोटी….६

मदत कुणाची मिळत होती,  आला दिवस जाई निघूनी  ।

काव्यातील आनंदात परि,  डुबता सारे विसरूनी…. ७   

विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।

अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता….८ 

अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते   ।

उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते….९

लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी  ।

परिस्थितीशी झगडा देवूनी,  बाहेर आणती कुणी प्रसंगी….१०

गेलो विसरूनी उदास दिन ,  आज उमटले चित्र निराळे  ।

सरस्वती नि लक्ष्मी दोघी,  आशीर्वाद त्यांचा मिळे…. ११

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

बागेतील तारका

 काव्यानुभव

फळ आज हे मधूर भासते,  तपोबलातील अर्क असे  । 

कष्ट सोसले शरिर मनानें,  चिज तयाचे झाले दिसे…..१

बसत होतो सांज सकाळी,  व्यवसाय करण्या नियमाने  ।

यश ना पडले पदरी.  केव्हा मान फिरविता नशीबाने….२

निराश मन सदैव राहूनी,  मनीं भावना लहरी उठती  ।

शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती….३

लिहीता असता भाव बदलले,  त्यात गुरफटलो पुरता  ।

छंद लागूनी नशाच चढली,  जीवनामधील रंग बघता…४

त्या रंगाच्या छटा उमटल्या,  फुला फुलातूनी दिसूनी येती  ।

सप्त रंगाचे मिलन दिसले,  आकाशाच्या क्षीतीजावरती….५

काव्यावरती जगेल कोण,  हवी भाकरी जगण्यासाठी  ।

मानहानी ती सदैव होई,  केवळ अल्पशा पैशापोटी….६

मदत कुणाची मिळत होती,  आला दिवस जाई निघूनी  ।

काव्यातील आनंदात परि,  डुबता सारे विसरूनी…. ७   

विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।

अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता….८ 

अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते   ।

उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते….९

लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी  ।

परिस्थितीशी झगडा देवूनी,  बाहेर आणती कुणी प्रसंगी….१०

गेलो विसरूनी उदास दिन ,  आज उमटले चित्र निराळे  ।

सरस्वती नि लक्ष्मी दोघी,  आशीर्वाद त्यांचा मिळे…. ११

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

देहातील शक्ती

बागेतील तारका

 देहातील शक्ती

नासिकांसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा

थंड हवा आत जाते,  गरम होवून बाहेर येते

अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून

भात्यापरि फुगते छाती,  हवा आत खेचूनी घेती

आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते

भावना जेव्हां जागृत होती,  रोमरोम ते पुलकित होती

अवयवे सारी स्फूरीनी जाती,  देहामधूनी विज चमकती

धनको ऋणको विद्युत साठे,  अलग अलग दिसती मोठे

विजातीय लिंग येता जवळी,  परिणाम दिसे विजेचा त्यावेळी

प्रकाश आहे आपल्या देही,  ज्ञानीजन तो सहज पाही

स्थिर करूनी चंचल मना,  प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना

उष्णता वीज प्रकाश शक्ती,  निसर्गाची रूपे असती.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

निसर्गाचे खेळणे

बागेतील तारका

 निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,

तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१,

बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे

यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२,

नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने

सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३,

जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी

पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४,

प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची

आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५,

मृत्यूच्या दाढे मधूनी,  एक सुटून जातां

मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता….६,

जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे

निसर्गाचे चाले अविरत हेच  खेळणे….७

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

निरागस जीवन

बागेतील तारका

निरागस जीवन

प्रफुल्लित भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं

गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१

खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे

खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२

सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली

भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३

निद्रेच्या  आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने

येणाऱ्या  दिवसा विषयी,  अजाण होता संपूर्णपणे….४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

बदलते भाव

बागेतील तारका 

बदलते भाव

कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येते

राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटते….१

देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले

अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले….२

देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी

केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी…३

जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून

भावांचे  रंग बदलती,  अंतर बाह्यावरून…४

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

भास

बागेतील तारका

भास

चमचम चमकते नाणें दूरी वरुनी दिसले ।
चांदीचे समजूनी मन तयावर झेपावले ।।

निराशा आली पदरीं जाणतां तुकडा पत्र्याचा ।
खोटी चमक बाळगुनी फसविणे गुणधर्म तयाचा ।।

भास ही चेतना ती तर्क वाढीवी कसा ।
दिसून येई सदैव मनावर जो उमटे ठसा ।।

ठसे उमटती संस्कारांनीं बघतां भोवती सारे ।
मनावर बिंबून जाते आणि भासते तेच खरे ।।

दिसून येतो ऊर्जा वापर देह, बुद्धी वा मनीं ।
संस्काराचे बीज अंकुरते परिस्थिती बघूनी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

भरताचा जाब

कृष्णकमळ

भरताचा जाब

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,
कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।

आम्ही बंधू चौघेजण,
झालो एका पिंडातून,
कसा येईल भाव परका ?
असतां एकची जीव, चार शरीरीं
कैकयीला भरत विचारी ।।१।।

वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,
आदर्श जीवन रघूवंशाचे,
कसली शंका मनांत होती ?
पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,
कैकयीला भरत विचारी ।।२।।

सर्व जणांचे प्राण होता,
जगणे कठीण झाले आतां,
रोष कशाला घेसी त्याचे,
अकारण ते आपल्या शिरावरी ?
कैकयीला भरत विचारी ।।३।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

ज्ञानाग्नि पेटवा

बागेतील तारका

ज्ञानाग्नि पेटवा

हातातील काडी घासतां पेटीवरी
अग्नि त्याच्यातील ज्वाला त्या धरी

लपलेला अग्नि घर्षणाने पेटतो
अज्ञान झटकता ज्ञानी उजाळतो

चितांत असतो प्रभू सदैव शांत
ओळखण्या त्यासी लागताती संत

संत हाच गुरु मार्गदर्शक असे
चित्तातील प्रभूला जागवित असे

उजळण्या मन घर्षण लागे संताचे
पेटवा ज्ञानाग्नि सार्थक होई जीवनाचे

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com