Monthly Archives: April 2017

संशयाचे भूत

संशयाचे भूत

हे भूत संशयाचे छळते कसे मनाला ।
करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला ।।
एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे ।
डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते ।।
गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा ।
कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा ।।
येता मनी संशय आपलाच ज्या घडीला ।
शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

पूजा तयारी

पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची ।
पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।।
स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई ।
भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।।
सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला ।
आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।।
करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा ।
देवापुढती रांगोळी काढी, दिसे कशी सुंदर बघा ।।
बागेमध्ये जाऊनी मग ती, दुर्वा काढीत असे ।
पुष्प करंडीत फुले निराळी, ताजी सुंदर दिसे ।।
स्नान करूनी ओलेत्याने, पाणी ठेवी पूजेसाठीं ।
घास घासूनी चंदन मग ते, भरे लहानशी वाटी ।।
हरिनाम घेई मुखीं सतत, मंत्र जप ते येईना ।
पूजेच्या परि तयारीमध्यें, उणीव कधी ठेवीना ।।
जमवित होती पूण्य राशी, पतिची सेवा करूनी ।
द्विगुणीत होई सांठा, प्रभू सेवा लाभूनी ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

दयेची दिशा

दयेची दिशा

निसर्ग नियमें दया प्रभूची, सदैव बरसत असते ।
दयेचा तो सागर असता, कमतरता ही पडत नसते ।।
अज्ञानी ठरतो आम्हींच सारे, झेलून घेण्या तीच दया ।
लक्ष्य आमचे विचलित होते, बघून भोवती फसवी माया ।।
उपडे धरता पात्र अंगणीं, कसे जमवाल वर्षा जल ।
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी, निघून जाईल वेळ ।।
भरेल भांडे काठोकाठ , केवळ धरता योग्य दिशेने ।
टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची, अशीच केवळ शुद्ध मनानें ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

पुनर्जन्म

पुनर्जन्म

संघर्षाची बिजें जळतील, जाणतां तत्व पुनर्जन्माचे ।
आपसांमधील हेवे-दावे, मिटून जातील कायमचे ।।
फिरत असते चक्र भोवती, स्वार्थीपणाचे भाव आणिते ।।
त्यांनाच मिळावे सारे काही, जाणता स्वरक्ताचे नाते ।
उगम झाला जाती धर्माचा, स्वार्थीपणाच्या याच कल्पनी ।।
वाटीत सुटतो प्रेम तयांना, केवळ सारे आपले समजूनी ।
कन्या जेव्हां सासरीं जाते, नाती-गोती नवीन बनती ।।
वाटत होते परकीय जे, आज आपले होवून जाती ।
आपलेपणाच्या भावामध्ये, दडले असते प्रेम सारे ।।
शत्रू देखील तुमचे होतील, समजूनी येता नाते खरे ।
भाऊ बहीण, मामा, चुलते, दूरवरची आप्त मंडळी ।।
बंधन ते पडून प्रेमाचे, बांधली जाती एकत्र सगळी ।
कुणास कळले याचक्षणी, परका कुणीतरी दुरीचा ।।
नात्यामध्ये नजीक असूनी, ऋणानूबंध तो पूर्वीचा ।
ओढला जाईल आत्मीयतेने, अज्ञानाचा पडदा उठता ।।
पूर्वजन्मीचे ज्ञान शिकविल, आपापसातील मानवता ।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

देह मनाचे द्वंद

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव, आंत बाहेरी आगळा ।
भिन्न भिन्न ते दर्शन घडते, यास्तव कांहीं वेळा ।।
एकच घटना परी विपरीत वागणे ।
दुटप्पेपणाचा शिक्का बसतो, याच कारणे ।।
देहा लागते ऐहिक सुख, वस्तूमध्ये जे दडले ।
अंतर्मन परि सांगत असते, सोडून दे ते सगळे ।।
शोषण क्रियेत आनंद असतो, ही देहाची धारणा ।
त्यागमधला आनंद मग तो, कसा कळे आत्म्याविणा ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com