Monthly Archives: August 2017

पुण्य संचय करा

पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे ।
संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।।
चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा ।
लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।।
संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा ।
कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।।
संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते ।
सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आला ! आला रे पाऊस !

आला ! आला रे पाऊस !

आला ! आला रे पाऊस !
धरणीला मीलनाची आंस //धृ//

गेली होती तापूनी रखरखली सारी,
अंग जाता वाळूनी भेगा पडती शरीरी ।।
थकली ती सोसूनी उकाड्याचे चार मास
आला ! आला रे पाऊस !
धरणीला असे मीलनाची आंस ।।१।।

पाणी गेले आटूनी नदी नाले कोरडे,
पहाटेच्या दवातूनी झाडे जगती थोडे ।।
गेली हरळी जळूनी बीजे टाकूनी आसपास
आला ! आला रे पाऊस !
धरणीला मीलनाची आंस ।।२।।

आता येईल वनीं चैतन्य लपलेले,
तरुवेली जाती फुलूनी पडणाऱ्या जलामुळे ।।
जाती सारे आनंदुनी दरवळत मातीचा सुवास,
आला ! आला रे पाऊस !
धरणीला असे मीलनाची आंस ।।३।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

कठीण खेळ

कठीण खेळ

चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।
दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?
निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।
फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?
चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।
आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।
देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।
हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

गुणधर्म

गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो रोकू म्हटले रोकू न शकलो
जे जे स्फूरले येईल ते ते ठरले असते होईल ते ते
बघूनी बाह्य जगला ठरवी मिळवीन तेच सुख भावी
त्याचेसाठी स्थिती आगळी उमज न येई ती सगळी
धडपड करीतो गडबड करीतो त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो
सुप्त गुण हे अंगी लपले उभारून ते येतील सगळे
मात करूनी विचारावरती सुप्त गुण हे विजयी होती
गुणधर्म ही ईश्वरी योजना घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com