Monthly Archives: April 2013

५२ मर्यादा

बागेतील तारका-

५२  मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी

मर्यादेतचि जगती सारे

अनंत असतां ईश्वर तो

मर्यादा घाली त्यास बिचारे

जाण जगाची होई इंद्रियांनी

त्यालाच असती मर्यादा

विचार सारे झेपावती

ज्ञान शक्ति ते बघूनी सदा

अथांग वाटे विश्व मंडळ

दाही दिशांचा भव्य पसारा

ईश्वर आहे  थोर त्याहूनी

मोजमापाच्या उठती नजरा

कशास करितो तुलना सारी

भव्य दिव्यता आम्ही दाखवूनी

अज्ञानानें पडती मर्यादा

अनंत तत्वास त्याच क्षणीं

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

401

विवीध-अंगी     ***२१

जीवनमार्गावरील प्रत्येक चुकासाठीं किमत मोजावी लागते

तुम्ही किती दक्ष आहांत ह्यानेच ती टाळता येते

 

५१ दुधामधील चंद्र

बागेतील तारका-

५१   दुधामधील चंद्र

कोजागिरीची पोर्णिमा परि

आकाश होते ढगाळलेले

शोधूं लागले नयन माझे

चंद्र चांदणें कोठे लपले ?

गाणी गाऊन नाचत होती

गच्चीवरली मंडळी सारी

आनंदाची नशा चढून मग

तल्लीन झाली आपल्याच परी

मध्यरात्र ती होऊन गेली

चंद्र न दिसे अजूनी कुणा

वायु नव्हता फिरत नभी तो

मेघ राहती त्याच ठिकाणा

दुध आटवूनी प्रसाद घेण्या

उत्सुक होतो आम्ही सारे

ढगांत लपल्या चंद्राला मग

क्षीरांत शोधती आमची नजरे

स्वादिष्ट मधूर दुग्धामृत ते

शशिधराच्या चांदण्यापरी

मेघांमध्यें तो लपला नसूनी

उतरला होता ह्याच क्षीरी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

396

विवीध-अंगी     ***२०

नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला देवकीने नंदाघरी पाठविलं

ईश्वरी अवताराची चाहूल लागूनही मातृ ह्रदय हळहळलं

५० काळाची झडप

बागेतील तारका-

५०   काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालित    काळ सदा फिरतो

वेळ साधतां योग्य अशी ती      त्वरित झेपावतो

भरले आहे जीवन सारे    संकटानी परिपूर्ण

घटना घडूनी अघटित     होऊन जाते चुर्ण

फुलांमधला रस शोषतां    फुलपाखरु नाचते

झाडावरी सरडा बसला    जाण त्यास नसते

आनंदाच्या जल्लोशांत कुणी    चालले सहलीला

अपघांत घडतां उंचावरी      नष्ट करी सर्वाला

खेळीमेळीच्या वातावरणीं    हसत गांत नाचते

ठसका लागून कांही वेळी      ह्रदय बंद पडते

सतत जागृत असता तुम्हीं    टाळता येई वेळ

सावध तुमचे चित्त बघूनी    निघून जाई काळ

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

131

विवीध-अंगी     ***१९

परक्यासमोर येताना निटनेटकेपणाची जाण तीव्रतेने असते

मनाचाही निर्मळपणा जर जपला तर ती आत्मोन्नती ठरते

४९ लोप पावूं लागलेली स्त्री लज्जा ।

बागेतील तारका-

४९  लोप पावूं लागलेली स्त्री लज्जा ।

खुरडून जाते फुलझाड

गर्द झाडीच्या वनांत

कोमेजून चालली स्त्रीलज्जा

धावपळीच्या जीवनांत   ।।१।।

भावनेची नाहीं उमलली

फूले तिची केव्हांही

नाजूकतेचे गंध शिडकूनी

पुलकित झाली नाही   ।।२।।

कोमेजल्या भावना

साऱ्या हाताळल्या जाऊन

एकांतपणाची ओढ

दिसेल मग ती कोठून   ।।३।।

गर्दीच्या ओघामध्यें

धक्के सततचे जेथे असे

प्रेम भावना जातां उडूनी

ओलावा मग रहात नसे   ।।४।।

स्त्री लज्जेची भावना

जी युगानूयुगें जपली

उंबरठा ओलांडता

लोप पावूं लागली   ।।५।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

१०५

विवीध-अंगी     ***१८

रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते श्रेष्ठ असू शकते

मुलीच्या आग्रही वागण्याने व सुनेच्या मृदु सिवभावाने ह्याची जाण येते

 

४८ उगवत्या सुर्याला नमस्कार

बागेतील तारका-

४८   उगवत्या सुर्याला नमस्कार

उगवता सुर्य, नमन करती त्याला

विसरती सारे सूर्यास्ताला   ।।धृ।।

ऐश्वर्याची झलक

श्रीमंतीचे सुख

बिन कष्टाची संपत्ति

लक्ष्य मिळविण्या ती

माना डोलावती, डामडौलाला    ।।१।।

उगवता सुर्य, नमन करती त्याला

विसरती सारे सूर्यास्ताला

प्रथम हवे दाम

तरच होईल काम

पैशाच्या भोवती

सारे फिरती

पैशाचे गुलाम    मानती पैशाला   ।।२।।

उगवता सुर्य, नमन करती त्याला

विसरती सारे सूर्यास्ताला

सत्तेची नशा

दाखवी जना आशा

स्वतःला समजे थोर

असुनिया शिरजोर

हांजी हांजी करती, बघता सत्तेला

उगवता सुर्य, नमन करती त्याला

विसरती सारे सूर्यास्ताला   ।।३।।

अधिकाराची रींत

बघती स्वहीत

गरजवंता अडविती

शोषण तयांचे करिती

सलाम करती आधिकाराच्या खूर्चीला   ।।४।।

उगवता सुर्य, नमन करती त्याला

विसरती सारे सूर्यास्ताला

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

९५

विवीध-अंगी     ***१७

मला माझ्या विक्षिप्त वागण्याची क्षमा कर

तुम्ही पायी चालत असाल,  मी मात्र तुमच्या खांद्यावर

 

४७ विजेचे दुःख

बागेतील तारका-

४७  विजेचे दुःख

चमकत लपकत आली

कडकडाट करुनी गेली

प्रकाशमान केले जगासी

दूर केले अंधारासी

भयाण होता अंधःकार

लख्ख प्रकाश देई आधार

घेई सर्वांच्या मनाचा ठाव

भिती असूनही प्रसन्न भाव

करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन

निर्माण झाला मनी अभिमान

परि दुःखी होते तीचे मन

‘क्षणिक’  लाभले तिला जीवन

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

14

विवीध-अंगी     *** १६

त्याच्या स्वभावांत मी खुप बदल आणले.

माझंच वागणं बदलून मी हे साध्य केले

 

४६ जीवन प्रवासी

बागेतील तारका-

४६  जीवन प्रवासी

तुझ्या घरी मी आले विसंबूनी

तव प्रेमाचे पडतां बंधन

सात पावले टाकीत टाकीत

सोपविले तव हाती जीवन

सरितेमध्यें नौका सोडली

वल्हविण्या तव हाती दिली

घेऊन जा ती नदी किनारीं

अथवा डुबूं दे ह्याच जळी

ऋणानुबंधाच्या ह्या गांठी

बांधल्या गेल्या पडतां भेटी

जन्मो जन्मीचा प्रवास सारा

पुनरपि चाले यौवन काठी

असेच जाऊं  दोघे मिळूनी

कांही काळ तो एक होऊनी

काळाच्या त्या ओघामध्यें

हालके हालके जाय मिळूनी

गत् जन्म तो स्मरे न कांही

भविष्य काय ते माहीत नाही

चालत असेल जोडी आपली

युगानुयुगें दोघे राही

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

५०७

विवीध-अंगी     *** १५

लग्नकार्यांत देण्या घेण्यावरुन रागवायच नसतं

शारिरीक, मानसिक, आर्थिक तणावाखाली

दुसरा किती दबलेला आहे ते समजायचं असत