Monthly Archives: February 2013

३८ त्याग वृत्ति

बागेतील तारका-

३८  त्याग वृत्ति

जीवनाच्या सांज समयीं

उसंत मिळतां थोडीशी

हिशोब केला स्वकर्माचा

वर्षे गेली होती कशी

दिवसा मागून वर्षे गेली

नकळत अशा वेगानें

सुख दुःखाच्या मिश्रणीं

जीवन गेले क्रमाक्रमाने

आज वाटे खंत मनीं

आयुष्य वाया दवडिले

ऐहिक सुखाच्या मागे जातां

हातीं न कांहीं राहिले

‘घेणे’  सारे आपल्यासाठीं

करीत जीवन घालविले

‘देण्या’  मधल्या आनंदाला

मन सदा वंचित राहिले

सुधारुन घे आतां तरी

अनुभवाने चूक आपली

उर्वरित वर्षे जाऊं दे

त्यागवृत्तीमध्ये सगळी

भोगातले सुख कसे ते

क्षणांत येवून क्षणांत जाई

त्यागातील समाधान परि

उशीरा लाभून सदैव राही

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

419

विवीध-अंगी     *** ७

शरीरातील ३६ तत्वे-

( पंच महाभूते )   १- पृथ्वी  २- आप  ३- तेज  ४- वायु  ५- आकाश

६- अहंकार  ७- बुद्धी  ८- अव्यक्त

( ज्ञानेद्रिये )  ९- कान  १०- नाक  ११-डोळे  १२- त्वचा  १३- जिव्हा

(कर्मेंद्रिये)  १४- हात  १५- पाय  १६- वाणी  १७- उपस्थ  १८- गुद   १९- मन

( ज्ञानेद्रियांचे पांच विषय)   २०- शब्द  २१- स्पर्श  २२- रुप  २३- रस  २४- गंध

(कर्मेंद्रियाचे पांच विषय) २५-चालणे २६- बोलणे २७- घेणे २८- देणे २९-मळमुत्राचा त्याग

३०- इच्छा  ३१- द्वेश  ३२- सुख  ३३- दुःख  ३४- चेतना  ३५- धृति  ३६- संघात

* ३७ खरा आस्तिक

बागेतील तारका –  

*  ३७  खरा आस्तिक

 

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं

विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी //

चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले

दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले //

नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी

समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी //

आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता

पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता //

काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति,  देखील ती

नाव प्रभुचे त्या वातावरणी,  कुणी न घेती //

प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी,  चित्त तयाचे स्वछंदी

रहात होता सुंदर बंगलीं,  अतिशय आनंदी //

छंद तयाला फुलझाडांचा,  बाग केली छान

विविधतेची झाडे झुडपे,  दिसे शोभावान //

दिवसभराचे कष्ट करुनी,  फुलवित असे बाग

सुवास सारा दरवळूनी,  डोलती तेथे नाग //

पक्षी आणि प्राणी जमवूनी,  संग्रहालय दिसले

आवाजांचे सूर निघूनी मग,  मधूर ते भासले //

मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग

आनंदाला सिमा पडेल,  कशी तेथे मग //

सारे होते नयन मनोहर,  त्या वातावरणीं

संबोधित होता त्या वास्तूला  “निसर्ग ” तो म्हणूनी //

वेड लागुनी तन्मय झाला,  सौंदर्याच्या ठायीं

निसर्गातील रस सदैव,  शोषित तो राही //

नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा

परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना //

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

355

विवीध-अंगी     *** ६

निवृत्तीचा कांठ   विसावा घेण्यासाठी नसतो

अनुभवाची शिदोरी घेऊन    नवा मार्ग शोधण्यासाठी असतो.

 

३६ मन तुझे कां गहिवरले ?

बागेतील तारका-

३६  मन तुझे कां गहिवरले ?

 

भाळी नसता कुंकंम तुझ्या गे

विरचक्र हे हातीं आले

मरणोत्तर हा किताब मळतां

मन तुझे कां गहिवरले ?

शुर विराची अर्धांगिनी तू

युद्धभूमिवर त्यास धाडीले

ओवाळूनी निरोप देतां

मन तुझे कां गहिवरले ?

देश सेवेत कामी यावे

ब्रिद त्याचे मनी ठसविले

सांगत असतां हेच दुजांना

मन तुझे कां गहिवरले ?

सुर्वणाक्षरीं वाचून गाथा

आदर्शमार्गी पडतील पाऊले

तव रक्ताचे नाते उसळतां

मन तुझे कां गहिवरले ?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

455

विवीध-अंगी     *** ५

बोल सारे अनुभवांचे   त्या बोलीची भाषाच न्यारी

सुख दुःखाच्या गुंत्यामधला   अर्थ सांगतो कुणीतरी

३५ दैवी देणगी

 

बागेतील तारका –

३५  दैवी देणगी

लुळा पांगळा बसूनी एकटा    गाई सुंदर गाणें

आवाजातील मधूरता     शिकवी त्याला जगणे

लुळा असला देह    तरी मन सुद्दढ होते

जगण्यासाठीं सदैव ते   उभारी देत होते

गीत ऐकण्या जमे भोवती    रसीक मंडळी सारी

नभास भिडता ताना    दाद मिळविती खरी

असामान्य ते एकची मिळतां    उणीवतेची खंत कशी

दुबळ्या देहीं कला श्रेष्ठ      जणू वीज चमकते रात्रीं जशीं

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

425

विवीध-अंगी  ***४

संपून जाईल कधीतरी सारे   मर्यादा ह्या ठरल्या असतां

जागृत रहा सदैव मनी    उंच भरारी घेतां  घेतां

 


३४ जीवन गुंता

बागेतील तारका-

३४  जीवन गुंता

दोन रिळांचे दोन धागे, एकत्र ते आले

एक मेकांत दोन्हींही, गुंफून परि गेले

गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा

शक्य होईल कसें आतां, वेगळे होण्याचा

खेंच बसतां वाढत गेला, तो गुंता

उकलून सुटणे नव्हते, त्याला आतां

दोनच पर्याय होते, त्याचे पुढती

तुटणें वा एकत्र राहणें, ह्या जगतीं

वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे

अवशेष राहतील परि कांहीं, जे न सुटणारे

दोन मनाचा असांच होतो, गुंता ह्या जीवनीं

राग लोभ- प्रेमादि भावना, जाती गुंतूनी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

389

विवीध-अंगी    ***३

अस समजल जात की मुल गर्भांत वाढत असताना, वा जन्म होताक्षणी त्याच्या हालचाली मधून ज्या लहरी उत्पन्न होतात, जो आवाज ध्वनीत होतो, जणू एखादा हूंकार बाहेर पडून ऐकू येतो. तो असतो ‘सोहंम’ (तो मी आहे)  – ‘कोहंम’  (मी कोण आहे) – ‘अहंम’ (मी आहे)  ह्या प्रतिध्वनीमध्ये. शास्त्रकारांनी ह्या शब्दांचे वर्णन अप्रतीम व अतीशय योग्य पद्धतीने केलेले आढळते. ते नवजांत बालक जणू जगाला ह्या त्याच्यासाठी असलेल्या नव्या वातावरणाला ओरडून सांगते की ‘ बाबानो मी तोच आहे. मी कोण आहेस, मी आहे, ‘

अर्थात जीवनांत फक्त ‘मी’ ला जाणा

33 मिळविण्यातील आनंद

बागेतील तारका-

33  मिळविण्यातील आनंद

आंस राहते सतत मनीं

मिळत नसते त्याचे साठी

प्रयत्न सारे होत असती

हाती नाही ते मिळविण्यापोटीं

प्रयत्न्यांत तो आनंद होता

धडपड होती, होती शंका

मिळविण्याच्या त्या लयीमध्यें

जिद्द मनाची आणिक हेका

यश मिळते जेव्हां पदरीं

धडपड सारी थंडावते

ज्याच्या करिता सारे सोशिले

त्यातील उर्मी निघून जाते

यशांत नाहीं आनंद तेवढा

मिळविण्यांत जो दिसून येई

कांहीं तरी ते मिळवावयाचे

ह्याच विचारी रमून जाई

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

317

विवीध-अंगी    ***२

The path of Devotion- भक्तीमार्गांत जगातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वरी अस्तीत्वाची जाणीव असणे गरजेचे ठरते. एकदा हे सारे त्या ईश्वराचेच समजले की माझे, माझ्यासाठी रहात नाही. आसक्ती जाते. कुणावर न प्रेम, न राग. सारे  ईश्वरार्पणची भावना, अद्वैत भावना, जाग्रत राहते. व तुम्ही ईश्वरी प्रेमांत राहतात.