Monthly Archives: January 2013

३२ प्राण्यांचे मोल समजा

बागेतील तारका-

३२  प्राण्यांचे मोल समजा

खरेदी केला सुंदर पक्षी

दाम देवूनी योग्य असे ते

नक्षिदार तो पिंजरा घेवूनी

शोभिवान मी केले घरातें

प्रातःकाळी उठोनी बघतां

चकीत होऊनी गेलो मनीं

पक्षाने त्या मान टाकली

पडला होता तळांत मरुनी

क्षणभर मनीं खंत वाटली

राग आला स्वकृत्याचा

आकारण ती हौस म्हणूनी

खरेदी केला पक्षी याचा

किती बरे निच मन हे ?

निराशा त्याला धन हानीची

पक्षाने तो प्राण गमविला

विषण्णता परि दुय्यम याची

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

३०३

विवीध-अंगी

१***

Path of Knowledge- ज्ञान मार्ग अर्थात ह्या मिथ्या, सत्य नसलेल्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करणे. त्याच वेळी स्ववर ‘ मी कोण ‘ ह्याचा शोध घेण्यासाठी लक्ष केंद्रित करणे, मनामधले विचार नष्ट करुन निर्माण होणाऱ्या शांततेची जाणीव ठेवणे हे असेल. ह्यालाच Objectless Awareness म्हणता येईल. अर्थात ध्येय रहीत जाणीव

 

३१ एक वर्षाची चिमुरडी बघते वाट

बागेतील तारका-

३१  एक वर्षाची चिमुरडी बघते वाट

भिरभिरणारे डबडबलेले

नेत्र भरले दाट   ।

अतूरतेने शोधीत होते

आपल्या आईची वाट  ।।

कासाविस तो झाला जीव

तळमळत राही प्राण   ।

एकच ध्यास मनी लागला

कोठे गेली आई म्हणून   ।।

क्षणाचाच होता विरह तेथे

न झाला तो ही सहन    ।

आई हाच जर प्राण असेल,

तर तिजवीन ठरे जगणे कठीण   ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

 

३० खरे ग्रह

बागेतील तारका-

३०  खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी

ग्रहराशींच्या दशेवरती

तेच होई जीवनीं तुमच्या

जसे ग्रहमंडळ फिरती

मित्र मंडळी सगेसोयरे

शत्रु असोत वा प्रेमाचे

जीवनांतल्या हालचालीवरी

परिणाम ते होई सर्वांचे

हेच सर्व ते ग्रह असुनी

सतत स्थान ते बदलती

परिस्थीती बघूनी तुमची

वागण्यांत तो फरक करती

अपयशाला कारणीभूत तो

असतो कुणीतरी नजीकचा

राहू केतू शनि वा मंगळ

ग्रहमान बनतो त्या घडीचा

यशाची चालता घोडदौड ती

मदत लाभते कांही जणांची

हे तर सारे इष्ट ग्रह ते

फुलवी सुमनें जीवनाची

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

314

२९ सासरी जाताना

 बागेतील तारका –

२९  सासरी जाताना

हास्यमुखानें निरोप दे ग, प्रेमानें भरला

विसरावी मी ओढ येथली, जांता सासरला   ।।धृ।।

खूप दिले तूं प्रेम आजवरी

सदैव ठेवित पदर शिरीं

पंखांना परि शक्ति देवूनीं

सांग मला ग घेण्या भरारी

सैल कर तूं पाश आपला

हास्यमुखानें निरोप दे ग, प्रेमानें भरला   ।।१।।

विसरावी मी ओढ येथली, जांता सासरला

संसारातील धडे देवूनी

केलीस तयार कष्ट घेवूनी

कुठे लोपला आज विश्वास तो

जागृत होता सदैव मनीं

नकोस देवूं वाव शंकेला

हास्यमुखानें निरोप दे ग प्रेमानें भरला   ।।२।।

विसरावी मी ओढ येथली, जांता सासरला

ते तर केवळ घर निराळे

मायेने परि आहे भरले

जसे मिळविले प्रेम माहेरी

वाटीत जाईन सासरीं सगळे

आठवण करिता येईन भेटीला

हास्यमुखानें निरोप दे ग प्रेमानें भरला   ।।३।।

विसरावी मी ओढ येथली, जांता सासरला

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

४३४

२८ शब्दाची ठिणगी

२८  शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी निघती ज्वाला

आकाशाला जावूनी भिडती

नष्ट करुनी डोंगर जंगल

हाः हाः कार तो माजविती

शब्दांची ही ठिणगी अशीच

क्रोधाचा तो वणवा पेटवी

मर्मघाती तो शब्द पडतां

अहंकार तो जागृत होई

सूड वृत्तीचा जन्म होऊनी

वातावरण ते दूषित होते

संघर्षाचा अग्नी पेटूनी

जीवन सारे उजाड करिते

कारण जरी ते असे क्षुल्लक

विनाश व्याप्ती होई भयंकर

केवळ तुमचे प्रेमळ शब्द

दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

३०१

२७ दिलासा

बागेतील तारका-

२७  दिलासा

ज्योतिष्याची चढूनी पायरी

जन्मकुंडली दाखवी त्याला

अडले घोडे ते नशिबाचे

कोणते अनिष्ट ग्रह राशीला

नशिबाची ती चौकट जाणूनी

आशा त्याची द्विगुणीत झाली

मनांत येता खात्री यशाची

जीव तोडूनी प्रयत्ने केली

प्रयत्नांती असतो ईश्वर

म्हणूनी मिळाले यश त्याला

आत्मविश्वास जागृत करण्या

‘भविष्य ‘ शब्द तो कामीं आला

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

३०२

२६ तुमचे यशस्वी कर्म

 २६  तुमचे यशस्वी कर्म

कसा, काय, कोण खेळला

बघत नाही कुणी

खेळातील यश अपयशाच्या

राहतात फक्त आठवणी

मरुन गेला नाटककार, तो

नांव ही गेले विसरुनी

जिवंत आहे आजही नाटक

रचिले होते त्यांनी

जगास हवे कर्म तुमचे

नको तुमचे जीवन

पशूसही जीवन असते

मरतो तो तसाच येऊन

वाल्यानें केले खून

लोक विसरुनी जाती

आजही वाचतां रामायण

कौतूक त्याचे करिती

वेशेघरी राहिलेला

गेला कालीदास विसरुनी

मेघदूत, शाकूंतल वाचतां

महाकवीच्या येती आठवणी

वेचीत असतो फुले आम्ही

सोडून सारे काटे

लोकही घेती उचलूनी

त्यांना जे चांगले वाटे

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

87