Monthly Archives: January 2014

१०६ प्रभू दर्शन

१०६   प्रभू दर्शन

महिमा कसा प्रभू तुझा आगळा

पावन करसी तूं भक्ताला

नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   ।।धृ।।

पुंडलीकाची महान भक्ति

माता पित्याचे चरणी होती

त्याची सेवा तुजसी खेचती

कसा उकलू मी ह्या कोड्याला   ।।१।।

नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

पातिव्रत्य हे दैवत समजूनी

पतिसेवेला घेई वाहवूनी

सावित्रीने दिले दाखवूनी

प्रभू वाकती सती शब्दाला   ।।२।।

नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

सेवा करिती कांहीं गुरुची

मानव सेवा हीच कुणाची

शक्ती वाढवूनी सत्कर्माची

पात्र ठरती प्रभू दर्शनाला   ।।३।।

नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

१०५ शोधूं कोठे त्यास ?

बागेतील तारका-

 १०५  शोधूं कोठे त्यास ?

शोधत होतो रुप प्रभूचें,  एक चित्त लावूनी

अंवती भंवती नजर फिरवी,  श्वास रोखूनी   ।।१।।

शांत झाले चंचल चित्त,  शांत झाला श्वास

ह्रदयनाडी मंद होऊनी,  चाले सावकाश   ।।२।।

पचनशक्ती हालकी झाली,  जठराग्नीची

शिथील झाली गात्रे सारी,  देह चैत्यन्याची   ।।३।।

देहक्रियांतील प्राण बिंदू तो,  असे ईश्वर

समरस होतां त्याच शक्तीशीं,  होई तो स्थिर   ।।४।।

शोधामध्ये चिंतन करतां,  ध्यान परि लागते

समाधी स्थितीत येतां प्राण,  अनंतात मिसळते   ।।५।।

नाही दिसले रुप ईश्वरीं,  आगळे एकटे

विश्वमंडळ ते तोच असतां,  शोधूं तयास कोठे ?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

१०४ इंद्रियें सेवकासम

१०४  इंद्रियें सेवकासम

खिडकीमधूनी टिपत होतो

बाह्य जगाचे द्दष्य आगळे

लोभसवाणें चित्र बघण्या

आतूर होऊन गेले डोळे

नयन नव्हते बघत ते

बघत होतो मीच खरा

खिडकीसम नयनातूनी

द्दष्य उमटते आंत जरा

संगीताचे सूर निनादूनी

लहरी त्यांच्या उठताती

कर्णा मधल्या पडद्यायोगे

आनंद मजला देवून जाती

मालक असूनी मी देहाचा

इंद्रिये सारी असती सेवक

ती केवळ साधने असूनी

आंतील ‘मीच’ असे साधक

मालक असूनी ताबा नसणें

स्वच्छंदी बनवी  सेवकाला

इंद्रिये ती गोंधळ घालती

जागृकता नसतां मनाला

सोडून द्यावी वृत्ति मनाची

अरोप करणें इंद्रियावरी

ती तर केवळ सेवक असूनी

मनाची इच्छा पूर्ण करी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

भावशक्तीची देणगी

बागेतील तारका-                        भावशक्तीची देणगी

भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले

करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले

जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम

उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म

भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी

पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी

भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन

नाचत गांत राहिली,  केले तुझ पावन

दया क्षमा शांतीचे भाव,  करुणेमध्ये भरलेले

त्यांत शोधता तुझा ठाव,  आनंदी मन झाले

सर्वस्व तुजला अर्पिता,  पावन होतो भक्तासी

भावनेची ज्योत पेटतां,  कदर तुच करिसी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

102 कृष्ण बाललीला

बागेतील तारका-

10२  कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी

बघून बाललीला

सांगा कोण आहे तरी कृष्ण ?

विचारी यशोदेला   ।।१।।

प्रासादातील मोदक खातां

तोंड ते उघडले

मुखामध्ये मोदक नसूनी

ब्रह्मांड ते दिसले   ।।२।।

उच्छाद मांडूनी कालीयाने

पाणी केले दुषित

मर्दन करण्यासाठीं त्याचे

उडी टाकी डोहात   ।।३।।

पूतना असूनी राक्षसिण

स्तनांत होते विष

स्तनपान करुनी त्यानें

तीला केले कासाविस   ।।४।।

खोड्या बघूनी यशोदेनें

उखळाला बांधले

उखळासहीत झाडे पाडूनी

चकीत त्यानीं केले   ।।५।।

अनेक अशा लीला करुनी

अचंब्यात पाडले

बालमुर्ति तो ईश असूनी

सर्वांस गुंगविले   ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००५०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com