Monthly Archives: December 2012

२५ आईच्या प्रेमाचा निरोप

२५  आईच्या प्रेमाचा निरोप

 

आई तुझे प्रेम

अनंत त्याचे दाम

तुलनेसी ब्रम्हांडी  ।।

जड तुझीच पारडी

पुंडलीक तुझ्यासाठी

विसरला जगत् जेठी  ।।

कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ

शब्दांत नाही सामर्थ्य   ।।

बलिदानाची तू मूर्ती

‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी किर्ती   ।।

कष्ट करुनी वाढविले छोटे

विसरती तुला होऊन मोठे  ।।

सोडूनी एकटे तुजसी

पंख फुटता उडे आकाशी   ।।

तरीही निरोप देऊन प्रेमाचा

कळस गाठला महानतेचा   ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

 

२४ कष्टाचे मोल

२४  कष्टाचे मोल

कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी

समाधानाची मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी

त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर

कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार

कष्ट पडती साऱ्याना,   करण्या जीवन यशदायी

विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई

अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान

त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

२३ स्वप्न दोष

२३  स्वप्न दोष

 

भंग पावले पाहीजे    स्वप्न माझे रातचे

तोडणे स्वप्न श्रृंखला   नसे मानवी हातचे  ।।

शिथिल गात्र बनती   जाता निद्रेच्या आधीन

उघडले जाते मग       विचारांचे दालन  ।।

किती काळ भरारी घेई   निश्चीत नसे कांही

विचार चक्र थांबता     स्वप्न दोष तो जाई   ।।

रात किड्यानो जागवा    स्वप्नावस्थे मधूनी

कुकुट कोकीळा येई      मदतीसाठी धावूनी   ।।

वाऱ्याची थंड झुळुक    पुलकीत देहा करी

उषा राणीचे प्रयत्न     यशस्वी सदैव ठरी  ।।

प्रयत्न करितो निसर्ग    निद्रावस्था मोडण्याचा

स्वप्नाचा दोष काढूनी   निरोगी बनविण्याचा  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

22 आस्तित्व

22   आस्तित्व

समोर ये तूं केंव्हा तरी

बघण्याची मज ओढ लागली

फुलूनी गेली बाग कशी ही

बीजे जयांची तूच पेरीली

कल्पकता ही अंगी असूनी

दुरद्दष्टीचा लाभ वसे

अंधारातील दुःखी जनांची

चाहूल तुज झाली असे

शीतल करुनी दुःख तयांचे

जगण्याचा तो मार्ग दाखविला

सोडूनी सारे वाटेवरी

आकस्मित तू निघूनी गेला

आस्तित्वाची चाहूल येते

आज इथे केंव्हातरी

तव आशिर्वादे जगतो सारे

हीच पावती त्याची खरी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com

२१ सहचारीणी

२१  सहचारीणी

 

दिपूनी गेले नयन त्या क्षणी

बघता तिची सोज्वळ मुर्ती ।

हाक निघाली अंतःकरणीं

तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।

जरी बघीतल्या अनेक सुंदरी

ठाव मनाचे हिने जींकले ।

सहचारीणी ही होईल तुझी

अंतरमनी शब्द उमटले  ।।

अनामिक जे होते पूर्वी

साद प्रेमाची ऐकू आली  ।

योग्य वेळ ती येता क्षणी

ह्रदये त्यांची जुळुनी गेली  ।।

शंका भिती आणि तगमग

असंख्य भाव उमटती मनी ।

विजयी झाले ऋणानूबंधन

बांधले होते भावबंधनी  ।।

उचंबळूनी दाटूनी आला

ह्रदयामधला ओलावा  ।

स्नेह मिळता प्रेम मिळाले

जगण्यासाठी दुवा ठरावा  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

२० कळसूत्री बाहुल्या

 

२०  कळसूत्री बाहुल्या

नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे

टकमक पाहात होत्या,  हांसत चोहीकडे

झीम्मा खेळे, फुगडी खेळे,  गरगर फिरती

हातवारे करुन त्या,  माना डोलावती

जवळ येवून गुजगोष्टी,  सांगे एकमेकींना

सासू नणंद यांच्या,  कुलंगड्या काढतांना

सुख दुःखाच्या कथा,  सांगितल्या त्यांनीं

कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी

अज्ञानी गरीब बिचाऱ्या,  जेंव्हा संकल्प करती

कळसुत्री बाहूल्या त्या,  दोर इतरां हातीं

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

३६४

१९ प्रेम झरा

१९  प्रेम झरा

नाही गेली अटूनी माया    आजही वाहते झऱ्यासारखी

उगांच कां तू खंत करशी   न होशील मज पारखी

वाहत असता फुटले फाटे    जीवनातील वळणावरी

जो तो घेई उचलूनी वाटा    नशीबी असेल त्याच्या परि

कसा राहील ‘साठा’ आता     मनसोक्त ते जाण्या वाहूनी

तृप्त करिल परी तृष्णा तुझी   ओंझळभर घेता पिऊनी

कुणीतरी आहे पाठीराखा      चालत रहा तू आनंदानी

आखंडीत मी प्रेम झरा      थकूनी जाता देईल पाणी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@gmail.com