Monthly Archives: September 2013

82 भरताचा जाब

बागेतील तारका-

82  भरताचा जाब

 

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी

कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।।

आम्ही बंधू चौघेजण

झालो एका पिंडातून

कसा येईल भाव परका ?

असतां एकची जीव, चारी शरिरीं

कैकयीला भरत विचारी   ।।१।।

वचनपूर्ति ब्रीद ज्याचे

आदर्श जीवन रघूवंशाचे

कसली शंका मनांत होती ?

पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी

कैकयीला भरत विचारी   ।।२।।

सर्व जणांचे प्राण होता

जगणे कठीण झाले आतां

रोष कशाला घेसी त्याचे ?

अकारण ते आपल्या शिरावरी

कैकयीला भरत विचारी   ।।३।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

८१ तमोगुण

बागेतील तारका-

८१  तमोगुण

राज्य तमाचे येथें    बाह्य जगावरती

म्हणून दिसे आम्हां   विध्वंसक प्रवृती

नाश करण्यासाठीं   शक्तिच हवी येथे

हेच रुप शिवाचे   समजण्या अवघड जाते

जागा करु देई   नविन घटनाना

चक्र कसे चालेल   न मिटवता त्यांना

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

  bknagapurkar@gmail.com

८० भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

बागेतील तारका-

८०  भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी

युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी

कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।।

आई वडिलांची सेवा

पुंडलीक भक्तीचा ठेवा

भक्तित होई तल्लीन

जगास गेला विसरुन

उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।।

कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी

विषाचा तो पेला

मीरेनें प्राशन केला

भजनांत गेली दंग होऊनी

पचविलेस विष तूं घेऊनी

दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा सहन करी   ।।२।।

कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी

भक्तीत गुंगली राधा

तुमचा होता ध्यास सदा

कष्ट पडता संसारी

विसरुन गेली ती सारी

झेललेस तूंच ते वार    पडले तिच्या पाठीवरीं   ।।३।।

कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी

राहीला नाथाघरीं

आनंदाने पाणी भरी

श्रीखंड्या समजे तुजला

कुणी न जाणी भक्तीला

सुगंधी चंदन घासूनी,    सेवा नाथाची करी    ।।४।।

कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी

सखूसाठीं धावला

देह तो झिझविला

निवडणे केले, कांडणे केले

राशीभर धान्य दळले

उभा राहूनी पाठीं,    सखूचे कामी मदत करी   ।।५।।

कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 bknagapurkar@gmail.com

७९ प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

बागेतील तारका-

 

७९   प्रभाते नाम घ्या जगदंबेचे

प्रभात झाली उठा हो

मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।

कांहीं काळासाठीं

नव्हता जगाचे पाठीं

कोठे तुम्हीं होता

न कळे आठवता

जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।।

प्रभात झाली उठा हो

मुखीं नाम घ्या जगदंबेचे

विश्रांतीचा काळ हा

शांततेने गेला पहा

देह मनाची धावपळ

थांवली कांहीं काळ

पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।।

प्रभात झाली उठा हो

मुखीं नाम घ्या जगदंबेचे

गेल्या होत्या स्मृतिं

कांहीं काळांती

संपुन छोटे पर्व

परत लाभले सर्व

उपकार समजोनी याते   आभार माना तिचे   ।।३।।

प्रभात झाली उठा हो

मुखीं नाम घ्या जगदंबेचे

सोडून देण्या दुःख

निद्रा मार्ग एक

नव्या जोमाने उठा

शोधा यशाच्या वाटा

हुरुप येण्या जीवनी   आशिर्वाद मागा तिचे   ।।४।।

प्रभात झाली उठा हो

मुखीं नाम घ्या जगदंबेचे

डॉ.भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail – bknagapurkar@mail.com

७८ चिंतन

बागेतील तारका-

७८  चिंतन

 

ज्याचे चिंतन आम्ही करतो

तोच  ‘शिव’ चिंतन करतो

स्वानुभवे चिंतन करुनी

चिंतनशक्ति दाखवितो

जीवनाचे सारे सार्थक

लपले असते चिंतनात

चिंतन करुनी ईश्वराचे

त्यांच्यात एकरुप होण्यात

सारे ब्रह्मांड तोच असूनी

अंश रुपाने आम्ही असतो

जेव्हां विसरे बाह्य जगाला

तेव्हांच तयांत सामावतो

चिंतन असे निश्चीत मार्ग

प्रभूजवळ तो जाण्याचा

लय लागूनी ध्यान लागतां

ईश्वरमय होण्याचा

डॉ. भगवान नागापूरकर

९००५०७९८५०

e-mail bknagapurkar@gmail.com

 

७७ दानशूर कर्ण

बागेतील तारका-

७७  दानशूर कर्ण

महाभारतातील कर्णाचे स्थान   अद्विती असून

मान जाई उंचावून    त्याला समजोनी घेता   ।।१।।

सुर्यपुत्र कर्ण    घनुर्धारी महान

दानशुर तो असून   इतिहास घडविला   ।।२।।

सुर्य आशिर्वादे जन्मला  कवच कुंडले लाभती त्याला

रक्षण वलय शरीराला   मिळती कर्णाच्या   ।।३।।

अंगातील कर्तृत्व शक्ती    माणसाला उंचावती

शक्तीस वाट फुटती    शोधूनी त्याची योग्यता   ।।४।।

जन्मुनी प्रथम पांडव    सहवासांत सारे कौरव

हेच त्याचे खरे दुर्दैव    नियतीचा होई खेळ   ।।५।।

महाभारत युद्ध प्रसंगी    कौरवामध्ये कर्ण अग्रभागीं

होता तो विजयाच्या मार्गी    हादरुन सोडले पांडवाना   ।।६।।

इंद्रासह सर्व देव आकाशी   बघती अर्जुन-कर्ण युद्धासी

परी चित्त त्यांचे कृष्णासी   बघती त्याची लिला   ।।७।।

थोपवून धरिला अर्जून रथ    असूनी सारथी भगवंत

बाण शक्तिनें नेला रेटीत    कृष्ण परमात्म्यासह   ।।८।।

शक्तीचे हे दिव्य दर्शन   बघू लागले आकाशांतून

इंद्रादी देव विस्मयित होऊन  न्याहळूं लागले कर्णाला   ।।९।।

चकीत झाले देवगण   यश अर्जुना यावे म्हणून

कवच कुंडले मागावी दान   इंद्र करी मनीं विचार   ।।१०।।

प्रातः काळची सुर्य किरणे   सुचवी कर्णा सावध राहणे

रुप घेतले इंद्राने      दान मागण्यासाठीं   ।।११।।

कर्ण होता दानशूर    मन त्याचे उदार

न घेई तो माघार    संकल्प करिता एकदां   ।।१२।।

इंद्र देवाचा राजा    ठोठती कर्ण दरवाजा

ठेवूनी मनी भाव दुजा    रुप घेतले याचकाचे   ।।१३।।

देवांचा नृपती   दान मागण्या येती

हे माझे भाग्य असती   सत्व परिक्षा देण्याचे   ।।१४।।

ओळखले याचकाला    इंद्राच्या सत्य रुपाला

अभिवादन केले तयाला    कवच कुंडले देई दान   ।।१५।।

कवच कुंडलाचे दान    स्वहत्याचे ठरले कारण

असूनी कर्णा हे ज्ञान    इंद्रसी दानधर्म केला    ।।१६।।

इंद्रापरी याचक कोण   जो मागेल मजसी दान

त्याचा कर्णा अभिमान    हीच त्याची श्रेष्ठता   ।।१७।।

कर्णाचे हे दान    ठरले त्याचे समर्पण

करी त्यासी महान    अजरामर करुनी   ।।१८।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e.mail-  bknagapurkar@gmail.com

७६ ईश्वर शक्तीरुप

बागेतील तारका-

७६  ईश्वर शक्तीरुप

तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला

सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला

विजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारी काळोख

प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक

साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां

विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां

झाडावरले पडता फळ,  भूमी घेई खेचुनी त्याला

गुरुत्वाकर्षन शक्ति ही,   झलक दाखविते जगाला

ईश्वरा अस्तित्व भासे,  अशाच शक्तिरुपानें

अद्दष्य असुनी परिणाम,   दाखवी निसर्ग सुप्त गुणानें

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com