Monthly Archives: January 2018

खोटे नाणे

खोटे नाणे

कसे आले कुणास ठाऊक खोटे नाणे हाती
गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें
कसा आला नशिबी निराशा मनी येते
अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले
लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले
मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे
नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे
केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब
भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ
खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने
नीच मनाचा असून मी पचविले ते हसण्याने
लिहीला नंबर टिकीटाचा एका कागदावरी
कोटाच्या खिशांत ठेवले तिकीट जपून भारी
निकाल वाचूनी नाचू लागतो आनंदाने पुरता
लाखाचे ते बक्षिस लागूनी लाखोपती बनता
धावत गेलो ऑफिसातूनी तिकीट घेण्या घरी
कोट नव्हता दिसत तेथे रोजच्या जागेवरी
इतर कपड्यामध्ये टाकला धूण्या परीटाकडे
धावत सुटलो नदीवरती शोधण्या तो तिकडे
सुकवलेल्या कपड्यातूनी कोट काढला
तुकडे बघूनी त्या तिकीटाचे मुर्च्छा आली मला
खऱ्या नाण्यासम चालले नशिबही वेगाने
खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

आत्म्याची हाक

आत्म्याची हाक

उचंबळूनी येतील शब्द, हृदयामध्ये दडले जे ।
संदेश असता सर्वांसाठी, कुणी न म्हणतील ते माझे ।।
जे जे काही स्फूरूनी येते, जेव्हा अवचित समयी ।
हृदयामधली हाक असे, ठरते आनंद दायी ।।
‘आनंद’ आहे कोणता हा, अन् येई कोठूनी ।
अंतर्यामी सर्वांच्या , सदैव राही बैसूनी ।।
बाहेर पडूनी झेप घेई दूजा हृदयावरी ।
तेथेही जो आनंद बैसला. स्वागत त्याचे करी ।।
पटे मनाला विचार , रूचणारा जो असे ।
हृदयामधला हाच आनंद, स्फूर्ती देवता भासे ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com