Monthly Archives: July 2014

धरणीकंप

बागेतील तारका-

धरणीकंप

कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।।

जागो जागी अत्याचार     सर्वत्र दिसे भ्रष्टाचार

वाढले भयंकर अनाचार

गरीब जनता त्रस्त होऊनी जाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।

 

रक्षण नाही स्त्रियांचे     प्रमाण वाढले बलात्काराचे

प्रकार घडती विनयभंगाचे

हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।

 

लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची

खून पाडती अनेकांचे

प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।३।।

 

गीतेमध्ये दिले वचन    अर्जुनासी प्रभूचे  तोंडून

प्रभूचे होईल पुनरागमन

अत्याचार वाढता जगाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।४।।

 

शब्द आपला पाळूनी    येईल  तो अवतार घेउनी

सुखी करील दु:ख नाशूनी

विश्वास ठेवा गीतेतील शब्दाते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।५।।

 

ठेवा निर्मळ देह आणि मन     पवित्रतेचे करा वातावरण

टाळू नका ह्या स्वागत संधीते

ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।।६।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

 

 

विजेचे दुःख

बागेतील तारका-

विजेचे दुःख

 

चमकत लपकत आली

कडकडाट करुनी गेली

प्रकाशमान केले जगासी

सारुनी दूर अंधारासी

भयाण होता अंधःकार

लख्ख प्रकाश देई आधार

घेई सर्वांच्या मनाचा ठाव

भिती असूनही, प्रसन्न भाव

करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन

निर्माण झाला मनी अभिमान

परि दुःखी होते तीचे मन

‘क्षणिक’ लाभले तिला जीवन

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

 

जुळे

बागेतील तारका-

जुळे

 

दोघे मिळून आलां              हातात घेऊन हात

हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात

 

दोघांची मिळूनी शक्ति        दुप्पट होत असे

सहभागी होतां,युक्ति          यशाची खात्री दिसे

 

एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती

रवि-किरण होऊन जुळे                प्रकाशमान बनती

 

ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत

गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत

 

एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची मिळे

एकत्र मिळूनी काम करा       तुम्ही आहांत जुळे

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail   bknagapurkar@gmail.com

आशिर्वाद

बागेतील तारका-

 

आशिर्वाद

 

घक्के देऊन आली   धरणीकंप करुन

भावना मनीं चमकली   बनेल ही महान  ।।

बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव

तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।।

शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे

सर्वामध्यें चमकून  प्रमाण मिळे यशाचे   ।।

एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश

प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।।

विजे सारखी चमकूनी   झेप घे नभांत

प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   ।।

एका गोष्टीची जाण   असावी तुझ्या मनीं

मिळण्यास हा मान   पाठीराखे आहेत इतर कुणी   ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com