102 कृष्ण बाललीला

बागेतील तारका-

10२  कृष्ण बाललीला

चकित झाले गोकूळवासी

बघून बाललीला

सांगा कोण आहे तरी कृष्ण ?

विचारी यशोदेला   ।।१।।

प्रासादातील मोदक खातां

तोंड ते उघडले

मुखामध्ये मोदक नसूनी

ब्रह्मांड ते दिसले   ।।२।।

उच्छाद मांडूनी कालीयाने

पाणी केले दुषित

मर्दन करण्यासाठीं त्याचे

उडी टाकी डोहात   ।।३।।

पूतना असूनी राक्षसिण

स्तनांत होते विष

स्तनपान करुनी त्यानें

तीला केले कासाविस   ।।४।।

खोड्या बघूनी यशोदेनें

उखळाला बांधले

उखळासहीत झाडे पाडूनी

चकीत त्यानीं केले   ।।५।।

अनेक अशा लीला करुनी

अचंब्यात पाडले

बालमुर्ति तो ईश असूनी

सर्वांस गुंगविले   ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००५०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

Leave a comment